पाचोऱ्यात उद्या “कापूस पिक परिसंवाद” व प्रशिक्षणाचे आयोजन

पाचोरा – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । पाचोरा येथील राज्य शासनाच्या कृषी विभाग व येथील निर्मल सिड्स संयुक्त विद्यमाने खानदेशातील नगदी व मुख्य कापूस पिकाचे उत्पादन वाढविण्यासाठी परिसंवाद व प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.

मंगळवारी २४ रोजी सकाळी ९ ते १२ वाजेपर्यंत या कार्यक्रमाचे आयोजन सारोळा बुद्रुक रोडवरील समर्थ लॉन्स येथे करण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी नोंदणीसाठी व प्रशिक्षण साहित्य घेण्यासाठी सकाळी ७.३० ते ८.३० वाजेच्या दरम्यान उपस्थित राहणे आवश्यक आहे.

या कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार किशोर पाटील व जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या हस्ते होणार आहे. तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी संभाजी ठाकूर, उप संचालक संजय भोकरे, उपविभागीय कृषी अधिकारी नंदकिशोर नयनवाड, तालुका कृषी अधिकारी रमेश जाधव तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषद सदस्य मधुकर काटे, रावसाहेब पाटील, दिपकसिंग राजपूत, पदमसिंग पाटील, माजी सभापती सुभाष पाटील, शेतकरी सेनेचे जिल्हा प्रमुख अरुण पाटील उपस्थित राहणार आहेत.

मंगळवारी होणाऱ्या कापूस पिकावरील लागवडी पासून ते काढणीपर्यंत मिळणाऱ्या प्रशिक्षणात निर्मल सिड्सचे जेष्ठ शास्रज्ञ डॉ. सुदामसिंह राजपूत, डॉ. किशोर पाटोळे, कृषी विज्ञान प्रयोग शाळेचे समन्वयक डॉ. बाहेती हे कापूस पिकावरील किड रोग नियंत्रण, डॉ. वैभव सुर्यवंशी कापूस पिकावरील यांत्रिकीकरण, डॉ. महेश महाजन कापसावरील विविध प्रकारच्या रोगावर तर डॉ. बी. डी. महाजन हे आधुनिक लागवड तंत्रज्ञान यावर मार्गदर्शन करणार आहेत.

यावेळी जळगाव जिल्हयातील सन २०१८ – १९ ते सन २०२० – २१ या तीन वर्षांत मिळालेल्या आदर्श शेतकरी पुरस्कार प्राप्त शेतकरी विश्वासराव शेळके (लोहारा), अनिल सपकाळे (जळगांव), समाधान पाटील (एरंडोल), रविंद्र महाजन (जामनेर) यांचा मान्यवरांचे हस्ते सत्कार करण्यात येणार आहेत. या कार्यक्रमात जळगांव दुरदर्शन केंद्राचे सतिष पप्पू सुत्रसंचलन करणार आहेत. या प्रशिक्षणाचा शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात लाभ घ्यावा असे आवाहन तालुका कृषी अधिकारी रमेश जाधव व सर्व मंडळ अधिकारी यांनी केले आहे.

 

Protected Content