७० हजार कापूस बियाण्यांची पाकिटे उपलब्ध

एरंडोल – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । खरीप हंगामाच्या पार्श्‍वभूमीवर तालुक्यातील कासोदा एरंडोल येथील तालुकास्तरीय भरारी पथकाने कृषी केंद्रांना अचानक भेट दिली असून तालुक्यात कापूस बियाणांची 70 हजार पाकिटे उपलब्ध झाल्याची माहिती मिळाली आहे.

यावेळी भरारी पथकात तालुका कृषी अधिकारी शरद बोरसे पंचायत समिती कृषी अधिकारी बी. एस. मोरे व मंडळ कृषी अधिकारी यांचा समावेश असून बियाणांचा साठा तपासण्यात आला. कापसाचे बियाणे एक जूनपासून विक्री करावे, अशी सक्त सूचना कृषी केंद्रांना देण्यात आली आहे. तालुक्यात कापसाच्या बियाण्याचे ७० हजार पाकिटे उपलब्ध आहेत. याशिवाय ज्वारी बाजरी सोयाबीन व इतर बियाणांचा साठासुद्धा कृषी केंद्रांमध्ये उपलब्ध आहे.

बियाणे खरेदी संदर्भात शेतकऱ्यांची फसवणूक किंवा आर्थिक लूट होऊ नये यासाठी भरारी पथक सतर्क असून तसे आढळून आल्यास संबंधित दुकानदारा विरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल असे तालुका कृषी अधिकारी शरद बोरसे यांनी सांगितले. कृषी केंद्र चालकांना तपासणी मोहिमेच्या वेळी काही सूचना देण्यात आल्या, साठा रजिस्टर ,पावती बिलावर शेतकऱ्यांची स्वाक्षरी ,दर पत्रक बोर्ड, दरांमधील तफावत, आदी बाबींचा भरारी पथकाने आढावा घेतला

Protected Content