विद्यापीठात जागतिक उद्योजकता दिनानिमित्त कार्यक्रम

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जागतिक उद्योजकता दिनानिमित्त कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील भाषा अभ्यास प्रशाळा व संशोधन केंद्रात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

२९ ऑगस्ट हा जागतिक उद्योजकता दिन म्हणून साजरा केला जातो. विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकतेची आवड निर्माण व्हावी म्हणून भाषा अभ्यास प्रशाळेत झालेल्या या कार्यक्रमात इनोव्हेशन ॲण्ड इन्क्युबेशन सेंटरचे संचालक प्रा. राजेश जवळेकर, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे विभागीय संचालक अलोक मिश्रा यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. व्यवस्थापनशास्त्र प्रशाळेच्या संचालक प्रा. मधुलिका सोनवणे अध्यक्षस्थानी होत्या.

डॉ. जवळेकर म्हणाले की, मराठी कुटुंबात लहानपणापासून नोकरीचे विचार रूजवले जातात त्यामूळे उद्योजक घडत नाहीत. विद्यार्थ्यांनी आपल्या क्षमता ओळखून केवळ नोकरीचा न विचार करता करिअर ओरिएंटेड विचार करावा. श्री. मिश्रा म्हणाले की, विद्यार्थ्यांनी उद्योजकतेची मानसिकता ठेवावी. प्रा. मधुलिका सोनवणे यांनी उद्योजक होण्यासाठी आवश्यक गुणांची माहिती दिली. प्रास्ताविक प्रशाळेच्या संचालक प्रा. मुक्ता महाजन यांनी केले. सुत्रसंचालन डॉ. प्रीती सोनी यांनी केले.

Protected Content