आदिवासी आश्रमशाळेत गणीत व इंग्रजीची गुणवत्ता क्षमता चाचणी

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी |  शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार सर्व आदिवासी आश्रम शाळा मधील विद्यार्थ्यांची क्षमता चाचणी परिक्षा संपन्न झाल्याची माहिती आदिवासी   एकात्मिक आदीवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी अरूण पवार यांनी दिली आहे.

 

यावल प्रकल्प कार्यक्षेत्राअंतर्गत येणार्‍या जळगाव जिल्ह्यातील १७ शासकीय व३२ असा एकुण ४९ अनुदानित आश्रमशाळा  मध्ये शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांची गुणवता क्षमता चाचणी शैक्षणीक सत्र २०२३-२४ची पहीली क्षमता चाचणी दिनांक २९ ऑगस्टरोजी प्रत्येक शाळांवर पार पडल्या आहेत. गणित व इंग्रजी क्षमता चाचणी परिक्षेत इत्तया५वी ते १०वी मधील शासकीय आश्रमशाळामधील ३५२४ विद्यार्थी व अनुदानित आश्नम शाळांमधील ११०७२ विद्याथी असे एकुण १४५९६ विद्यार्थी क्षमता चाचणी परिक्षा घेण्यात आल्यात. यात एकुण शासकीय आश्रमशाळेतील १३८३ मुले व१३०४ मुली असे२६८७ विद्यार्थ्यांनी परिक्षेत भाग घेतला, तर  अनुदानित आश्रमशाळेतील ६०१८ मुल आणि ३५३१ मुली असे एकूण ९५४९ परिक्षेत भाग घेतला.

 

विद्यार्थ्यांची गुणवत्ता निश्चित करण्यासाठी शैक्षणीक वर्षात तिन क्षमता चाचण्या घेण्यात येणार असुन . प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी यावल अरूण पवार यांनी परिक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी प्रकल्प कार्यालयातील अधिकारी /कर्मचारी यांची पर्यवेक्षक म्हणुन जिल्ह्यातील प्रत्येक शाळावर नियुक्त केलेले आहे. जिल्हा परिषदच्या शिक्षणधिकारी (प्राथमिक )चार भरारी पथकाच्या देखील नियुक्ती करण्यात आली होती. शाळेतील मुख्याध्यापक यांची केन्द्र संचालक व शाळेतील एक शिक्षक यांची प्रश्नपत्रिका कस्टड़ीअन म्हणुन नियुक्ती करण्यात आले होते.

 

जळगाव जिल्ह्यात प्रथम घेण्यात आलेल्या विद्यार्थ्यांची क्षमता चाचणी परिक्षा ही यशस्वीरित्या पार पडल्याचे सांगुन निकालानंतर विद्यार्थ्यांची गुणात्मकदृष्टया छाननी करून अप्रगत विधार्थ्यांना विशेष मार्गदर्शन करून सदर विषयांमध्ये गुणात्मक दर्जा वाढ करण्यात येईल याप्रमाणे विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणात्मक विकास सातत्याने व्हावा यासाठी परिक्षा घेण्यात आल्याची माहिती एकात्मिक आदीवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी अरूण पवार यांनी दिली आहे.

Protected Content