यावल महाविद्यालयात स्वच्छता मोहीम

राष्ट्रीय सेवा योजनाच्या वतीने विद्यार्थ्यांनी नोंदविला सहभाग

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. यावेळी विद्यार्थी व विद्यार्थींनी सहभाग नोंदविला.

यावेळी महाविद्यालयातील परिसरात श्रमदान करून साफसफाई करण्यात आली. यावलच्या महाविद्यालयातील परिसरातील मैदाना वरील प्लास्टिक व इतर कचरा जमा करून जाळण्यात आला तसेच यावल फैजपुर मार्गा वरील रस्त्यावर देखील स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यावेळी स्वच्छता कर्मचारी श्री महेश घारू यांचा सत्कार महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. ए. पी.पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रम अधिकारी डॉ.आर.डी. पवार, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी डॉ.एच.जी.भंगाळे, विद्यार्थी विकास अधिकारी डॉ.एस.पी.कापडे, महिला कार्यक्रमाधिकारी प्रा. प्रतिभा रावते, प्रा. नरेंद्र पाटील संतोष ठाकूर, अनिल पाटील, अमृत पाटील, प्रमोद जोहरे, मयूर लोधी, मनोज पाटील, स्वाती बारी, शुभांगी धनगर आदींनी परिश्रम घेतले.

Protected Content