मराठी मालिकेतील अभिनेत्यांची “खान्देश सखी मंच’च्या कार्यक्रमाला हजेरी

चाळीसगाव – लाईव्ह ट्रेन्ड्स न्यूज प्रतिनिधी | येथील राजपूत मंगल कार्यालयात “खान्देश सखी मंच’च्या वतीने आयोजित कार्यक्रमाला मराठी या वाहिनीवर प्रदर्शित होणाऱ्या “सावली होईन सुखाची’ या मालिकेतील अभिनेत्यांनी हजेरी लावली.

 

या श्रावण सोहळ्याला मालिकेतील अभिनेत्यांची हजेरी लावत खान्देश सखींसोबत फुगडीचा आनंद घेतला.

यावेळी श्रावण साज आणि नववारी साज अशा दोन स्पर्धा घेण्यात आल्या. स्पर्धेत खान्देश सखीच्या सदस्यांनी सहभाग नोंदवला. कार्यक्रमाला मराठी या वाहिनीवर प्रदर्शित होणाऱ्या “सावली होईन सुखाची’ या मालिकेतील अभिनेत्यांनी हजेरी लावली. कार्यक्रमादरम्यान खान्देश सखीच्या सभासदांनी मालिकेतील अभिनेत्यांसोबत गप्पाटप्पा देखील केल्या. मालिकेतल्या अभिनेत्यांसोबत खान्देश सखींचा फुगडीचा उत्सव पहायला मिळाला.

 

मालिकेतील “गौरी’ म्हणजेच सीमा कुलकर्णी यांनी देखील सखिन सोबत फुगडी चा आनंद घेतला. तसेच मालिकेतील “रुद्रच्या’ भूमिकेत असलेला रोनक शिंदे यांनी देखील चाळीसगावच्या नगरसेविका सविताताई राजपूत यांच्या सोबत फुगडीचा आनंद घेतला. आणि स्पर्धेत विजेत्या झालेल्या सख्यांना साडी आणि चांदीचे नाणे देऊन सन्मानित करण्यात आले.

 

यावेळी कार्यक्रमाला शिवनेरी फाउंडेशनच्या संचालिका प्रतिभाताई चव्हाण तसेच चाळीसगाव शहराच्या नगरसेविका सविता राजपूत यांच्यासह पंचक्रोशीतील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Protected Content