Home Cities जळगाव रोहिणी खडसे यांनी स्वीकारला महिला आघाडी प्रदेशाध्यक्षपदाचा पदभार

रोहिणी खडसे यांनी स्वीकारला महिला आघाडी प्रदेशाध्यक्षपदाचा पदभार


मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या ॲड.रोहिणी खडसे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महीला आघाडी प्रदेशाध्यक्ष नियुक्ती  करण्यात आली असून त्यांनी बुधवारी ३० ऑगसट रोजी मुंबई येथील पक्ष कार्यालयात आपल्या पदभार स्विकारला आहे.

पदभार घेण्यापुर्वी त्यांनी अध्यक्ष खा. शरद पवार, राज्याचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट घेऊन आभार व्यक्त केले. यावेळी रोहिणी खडसे म्हणाल्या की, पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाने माझ्या सारख्या पक्षाच्या सामान्य कार्यकर्तीवर विश्वासाने महीला आघाडी प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली. पक्ष नेतृत्वाने माझ्यावर टाकलेला विश्वास सार्थ ठरवेल, पक्ष संघटन वाढीसाठी मेहनत घेऊन आमदार शरद पवार यांचे आणि पक्षाचे विचार तळागाळापर्यंत पोहचवण्यासाठी प्रयत्न करेल, तसेच महिलांच्या न्याय हक्कासाठी पक्षाच्या माध्यमातून महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करेल असे रोहिणी खडसे यांनी सांगितले.


Protected Content

Play sound