भोंडणदिगर, पोपटनगर व खोलसर येथील सरपंचासह अनेकांचा शिवसेनेत प्रवेश

पारोळा – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | आमदार चिमणराव पाटील व जळगांव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष अमोल पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत तालुक्यातील भोंडणदिगर, पोपटनगर व खोलसर येथील सरपंचांसह अनेकांनी शिवसेनेत प्रवेश घेतला.

पारोळा तालुक्यातील भोंडणदिगर लोकनियुक्त सरपंच अधिकार अशोक पाटील, पोपटनगर सरपंच कैलास गोवर्धन राठोड, खोलसर कामतवाडी सरपंच ताराचंद गुमन भिल, भाजपा युवा मोर्चा तालुकाध्यक्ष अमोल अजबराव पाटील यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यावेळी या मान्यवरांचा आमदार चिमणराव पाटील व अमोल पाटील यांनी शिवसेनेत स्वागत केले.

याप्रसंगी तालुकाप्रमुख मधुकर पाटील, शेतकी संघाचे पोपट चव्हाण, शेतकी संघाचे संचालक भैय्यासाहेब पाटील, किशोर नगराज पाटील, राजेंद्र रामराव पाटील, ग्रामपंचायत सदस्य संजय दंगल पाटील, विजय बारकु पाटील, रविंद्र विनायक पाटील, सुभाष रमेश पाटील, तुकाराम गोविंदा पाटील, मा.उपसरपंच रंगराव धनराज पाटील, वाघरे सरपंच रावसाहेब पाटील, मनोहर शांताराम पाटील, पोलीस पाटील पांडुरंग पदम राठोड, भिका हटकर यांचेसह आदी मान्यवर उपस्थित होते.

Protected Content