वनविभागाने जप्त केला ३५ किलो डिंक; संशयित फरार !

रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रावेर तालुक्यातील पाल वनक्षेत्र परिसरातून बेकायदेशीरित्या ३५ किलो डिंकची वाहतूक करतांना वनविभागाने कारवाई केली. यावेळी संशयित आरोपीने दुचाकीसोडून पसार झाला आहे. याप्रकरणी वन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक असे की, रावेर वनक्षेत्रातील पाल परिमंडळ मधील पाल वनविभागातील मांजल रस्ता येथे वनकर्मचारी गस्तीवर असतांनान बेकायदेशीरित्या दुचाकीवरून डिंकची वाहतूक करत असतांना एकजण दिसून आला. जवळील ३५ किलो वजताना डींक जप्त करण्यात आला आहे. दरम्यान संशयित आरोपीने दुचाकी व मुद्देमाल जागेवर सोडून पसार झाला आहे. ३ हजार ८५० रूपये किंमतीचा ३५ किलो डिंक असून वनविभागाने जप्त केला आहे. ही कारवाई वनविभागाचे वनक्षेत्रपाल अजय बावणे रावेर, वनपाल डी.जी. रायसिंग वनपाल, वनरक्षक एम.एम तडवी, सुपडू सपकाळे यांनी केली. सदर कार्यवाही वनसंरक्षक धुळ्याचे उपवनसंरक्षक ऋषिकेश रंजन, जमीर शेख, सहाय्यक वनसंरक्षक यावल, प्रथमेश हडपे यांचा मार्गदर्शनाखाली करण्यात आली. फरार झालेल्या संशयितावर वन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Protected Content