औरंगाबादेत भाजप नेत्याच्या घरावर दगडफेक

औरंगाबाद (वृत्तसंस्था) औरंगाबादेत भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष भागवत कराड यांच्या घरावर शुक्रवारी रात्री दगडफेक झाली. यावेळी हल्लेखोरांनी घरासमोर उभ्या असलेल्या दोन गाड्याही फोडल्या. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. दरम्यान, औरंगाबाद शहरात भाजप आणि शिवसेना या दोन पक्षातील राजकीय वाद यानिमित्ताने वाढला आहे.

 

भागवत कराड यांच्या घरावर शुक्रवारी सायंकाळी राजकीय वैमनस्यातून हल्ला करण्यात आल्याचा आरोप होत आहे. भाजपमधून नुकतेच शिवसेनेत गेलेल्या किशनचंद तनवाणी यांच्यावर टीका करताना कराड यांनी ‘तनवाणी हा सत्तेला चिकटलेला मुंगळा आहे’, असे म्हटले होते. त्यामुळे तनवाणी समर्थकांनी हा हल्ला केल्याचा आरोप भाजपच्या गोटातून होत आहे. हल्ल्यानंतर भाजप कर्यकर्त्यांनी तातडीने क्रांती चौक पोलीस स्टेशन गाठून आरोपीला अटक करण्याच्या मागणीसाठी पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन केले. क्रांती चौक पोलिसांनी या प्रकरणात संतोष सुरे, रंगनाथ राठोड यांना अटक केली आहे. तर सचिन जव्हेरी याला ताब्यात घेण्यात आले आहे.

Protected Content