यावल महाविद्यालयात विद्यार्थिनीसाठी विविध स्पर्धा

compitition

यावल, प्रतिनिधी। येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात इंग्रजी विभाग व युवती सभेतर्फे विविध स्पर्धा घेण्यात आल्या. यात वक्तृत्व, निबंध, स्मरणशक्ती , केशभूषा व मेहंदी स्पर्धांचा समावेश होता.

यावल महाविद्यालयात घेण्यात आलेल्या वकृत्व स्पर्धेत अनुक्रमे कोमल बोरनारे, महेश आहिरे,अंकिता गडे यांनी यश मिळवले. निबंध स्पर्धेत प्रथम अंकिता गडे,द्वितीय दीपिका सोनार,तृतीय जागृती पाटील यशस्वी झाल्या. स्मरणशक्ती स्पर्धेत अंकिता गडे, चैतन्य चौधरी, कोमल बोरनारे यांनी अनुक्रमे क्रमांक प्राप्त केले. परीक्षक म्हणून प्रा.व्ही.बी. पाटील व प्रा.उंबरकर यांनी काम केले. युवती सभेतर्फे केशभूषा व मेहंदी स्पर्धा घेण्यात आली. केशभूषा स्पर्धेत अनुक्रमे रुबिना रशिद तडवी,प्राजक्ता संजय पाटील, रूपाली नथ्थू ढाके यांनी यश प्राप्त केले. तर मेहंदी स्पर्धेत प्रथम पुजा रुपचंद मोरे, द्वितीय अश्विनी राजेंद्र मंदवाडे व तृतीय कोमल महेश बडगुजर ह्या यशस्वी झाल्या. स्पर्धेचे परीक्षण प्रा.धनश्री बोदडे, प्रा.नजमा तडवी,प्रा.कलिमा तडवी यांनी केले. उपप्राचार्य प्रा .ए. पी‌. पाटील, डाॅ.एस. पी. कापडे, डाॅ. सुधा खराटे, प्रा. ए. एस. अहिरराव यांनी परिश्रम घेतले.सदर स्पर्धा प्राचार्या डॉ.संध्या सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आले‌.

Protected Content