प्रसुतीनंतर अतिरक्तस्त्रावाने विवाहितेचा उपचारादरम्यान मृत्यू

Crime

जळगाव प्रतिनिधी । प्रसुतीसाठी माहेरी यावल येथे आलेल्या विवाहितेचा प्रसुतीनंतर अतिरक्तस्त्रावाने उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी 10 वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी यावल पोलीसात झीरो नंबरने आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

याबाबत माहिती अशी की, यावल येथील माहेर असलेल्या विवाहिता तेजस्विनी अरविंद पवार (वय-22) रा. कोपरगाव शिर्डी जि.अहमदनगर या गरोदर महिला प्रसुतीसाठी काही दिवसांपुर्वी यावल येथे माहेरी आल्या होत्या. त्यांना पोटात प्रसुतीकळा आल्याने नातेवाईकांनी यावल ग्रामीण रूग्णालयात उपचारार्थ दाखल केले. दरम्यान विवाहितेची प्रकृती अधिक खालावल्याने वैद्यकिय अधिकारी यांनी जिल्हा वैद्यकिय महाविद्यालय जळगाव येथे जाण्याचा सल्ला दिला. नातेवाईकांनी तातडीने खासगी वाहनाने त्यांनी मंगळवारी दुपारी जिल्हा रूग्णालयात उपचारार्थ दाखल केले. त्याची सायंकाळी 7.30 वाजता बाळाला जन्म दिला मात्र ते देखील काही मिनीटात मृत झाले. दरम्यान आज सकाळी 9.45 वाजेच्या सुमारास अति रक्तस्त्रावाने शरीरातील पेशी कमी झाल्या त्यात विवाहितेचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी झीरो नंबरने यावल पोलीसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

Protected Content