आरोग्य निरीक्षकाचा मोबाईल लांबविला

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ तालुक्यातील पिंपळगाव खुर्द गावातील बसस्थानक येथून आरोग्य निरीक्षकाचा मोबाईल अज्ञात चोरट्यांनी चोरून येण्याची घटना घडली आहे. या प्रकरणी वरणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, वैभव कन्हैया भुते वय-२६, रा. येवती ता.बोदवड हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. ते भुसावळ तालुक्यातील पिंपळगाव खुर्द गावात आरोग्यवर्धिनी आरोग्य सेंटर येथे आरोग्य निरीक्षक म्हणून नोकरीला आहे. २१ मार्च रोजी दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास वैभव भुते हे पिंपळगाव खुर्द गावातील बसस्थानकाजवळ असताना अज्ञात चोरट्याने त्यांचा १० हजार रुपये किमतीचा मोबाईल चोरून नेला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी वरणगाव पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून रात्री ११ वाजता पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक फौजदार श्रावण जवरे हे करीत आहे.

Protected Content