बनावट खाते तयार करून तरूणला अश्लिल मॅसेजेस; अज्ञातावर सायबरला गुन्हा

जळगाव प्रतिनिधी । जामनेर तालुक्यातील एका तरूणाच्या नावाने बनावट इन्ट्राग्राम अकाऊंट बनवून अश्लिल मॅसेज पाठविणाऱ्या अज्ञात भामट्याविरूध्द सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

अधिक माहिती अशी की, सागर गोकुळ पाटील (वय-३०) रा. बजरंगपरा जामनेर जि.जळगाव हा तरूण शेती काम करून आपल्या कुटुंबियाचा उदरनिर्वाह करतो. त्याचे इन्स्ट्राग्राम ॲपवर अकाऊंट आहे. दरम्यान सागर पाटील यांच्या नावाने बनावट इंन्ट्राग्राम अकाऊंट अज्ञात व्यक्तीने तयार केले आहे.  या बनावट अकाऊंटच्या माध्यमातून सागर पाटील यांच्या मित्राच्या पत्नीचा फोटो स्टेटसवर अपलोड केला आहे. याबाबत सागर पाटील याला माहिती मिळाली असता खातेधारकाला संदेश पाठवून खाते डिलीट करण्याचा मॅसेज टाकला. परंतू समोरील अज्ञात व्यक्तीने खाते बंद न करत सागर पाटील याला अश्लिल मॅसेजेस पाठविण्यास सुरूवात केली. याप्रकरणी सागर पाटील यांच्या फिर्यादीवरून जळगाव सायबर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरूध्द आयटी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक बळीराम हिरे करीत आहे. 

Protected Content