मोहाडी येथील विवाहितेचा ४ लाखासाठी छळ; पतीविरोधात गुन्हा

जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील मोहाडी येथील माहेर असलेल्या विवाहितेला चार लाखासाठी पतीकडून छळ केल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात पती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील मोहाडी येथील माहेर असलेल्या अर्चना आनंद रंधे यांचा विवाह हरिविठ्ठल नगरातील आनंद सुधाकर रंधे यांच्याशी १६ जुन २०१५ रोजी रितीरिवाजानुसार मोहाडी ता. जि.जळगाव येथे झाला. त्यावेळी हुंडा पोटी विवाहितेच्या आई-वडिलांनी १ लाख रुपये दिले होते. दरम्यान लग्नाच्या ४ महिने चांगले वागविले. त्यानंतर पती आनंद रंधे याने लहान-सहान कारणावरून विवाहितेचा छळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर दुचाकी व घर बांधण्यासाठी माहेरहून पैश्यांची मागणी केली. विवाहितेच्या वडिलांनी कर्ज काढून पैसे दिले. त्यानंतर पुन्हा विवाहितेला व्यवसाय करण्यासाठी माहेरहून ४ लाख रुपयांची मागणी केली.

परंतु माहेरची परिस्थिती सांगितल्यावर देखील मारहाण करून शिवीगाळ करणे सुरू झाले. या त्रासाला कंटाळून विवाहिता चार वर्षाची मुलगी घेऊन माहेरी मोहाडी येथे निघून आल्या. यानंतर सोमवारी ३ जानेवारी रोजी सकाळी त्यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात पती विरोधात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून पती आनंद रंधे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास एमआयडीसी पोलीस कर्मचारी करीत आहे.

Protected Content