माजी सैनिकांच्या मुलांच्या वसतिगृहासाठी अधीक्षक पदभरती

जळगाव, प्रतिनिधी । जिल्ह्यातील सैनिकी मुलांचे वसतिगृहाकरीता कंत्राटी वसतिगृह अधिक्षक पदासाठी अर्ज मागविण्यात येत आहे. सदरचे पद हे 24 तास कामकाजाचे असून या पदासाठी रुपये १२ हजार ८७२ प्रतिमाह इतके मानधन आहे.

तरी जिल्ह्यातील माजी सुभेदार किंवा त्यापेक्षा वरिष्ठ पदावरुन निवृत्त झालेल्या, मराठी व इंग्रजी टाईपिंग येत असलेल्या माजी सैनिकांना आवाहन करण्यात येते की, या पदासाठी इच्छुकांनी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, जळगाव यांचेकडे दिनांक 10 जून, 2021 पर्यंत आवेदन सादर करावे. अधिक माहितीसाठी दूरध्वनी क्र. 0257/2241414 वर संपर्क साधावा. असे निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, राहुल पाटील यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

Protected Content