पाझर तलावातील बेकायदा वृक्षतोड : एकास दोन दिवसांची पोलीस कोठडी

यावल,   प्रतिनिधी । तालुक्यातील गिरडगाव ग्रामपंचायत क्षेत्राअंतर्गत असलेल्या पाझर तलाव परिसरातुन वृक्षांची अवैध तोडणीच्या गुन्ह्यात किनगाव येथील एका तरुणा अटक करण्यात आली आहे. त्यास भुसावळ न्यायालयात हजर केले असता त्यास  दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. 

 

या संदर्भात मिळालेल्या माहीतीनुसार, गिरडगाव तालुका यावल या गावातील ग्रामपंचायतच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या गट क्रमांक ३९, ४०, ४१ या क्षेत्रात जिल्हा परिषदच्या लघु सिंचन विभागाच्या माध्यमातुन असलेल्या पाझर तलावक्षेत्रात विविध वृक्षांची लागवड करण्यात आली होती. या ठिकाणी दि. १०  एप्रिल २०२० रोजी दुपारी ३ ते ४ वाजेच्या सुमारास  अनोळखी  १o ते  १२ जण  व किनगाव येथील राहणाऱ्या सद्दाम शाह खलील शाह (वय ३० वर्ष) यांनी सुमारे ७९ हजार रुपये किमतीची विविध वृक्षांची झाडे परवानगी शिवाय तोडुन नेल्याची तक्रार पोलीसात दिनांक १३ एप्रिल २०२० रोजी सरपंच अलकाबाई मधुकर पाटील (वय ५० वर्ष व्यवसाय शेती)  गिरडगाव ग्राम पंचायत सरपंच यांनी दिली होती. या गुन्ह्यातील संशयीत आरोपी सद्दाम शाह खलील शाह यास दिनांक ३  जुन २०२१ रोजी अटक करण्यात आली आहे. परिसरात नामचीन असलेल्या संशयीतास अटक करण्यास पोलीसांनी तब्बल एक वर्ष  लागली तरी कशी ? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.   या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरिक्षक जितेन्द्र खैरनार व सहाय्यक फौजदार अजीज शेख हे करीत आहे. संशयीत आरोपी सद्दाम शाह यास आज भुसावळ न्यायालयात हजर केले असता त्यास शनिवारपर्यंत दोन दिवसाची पोलीस कोठडी मिळाली आली आहे.

Protected Content