खंडेरावनगरात आढळला अज्ञात मुलीचा मृतदेह

 

जळगाव प्रतिनिधी । शहरातील हरीविठ्ठलनगरात एका अनोळखी मुलगी नाल्यात वाहून गेल्याची घटना आज  दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली. तिचा मृतदेह खंडेराव नगरातील पुलाजवळ आढळून आला आहे.

 

सविस्तर माहिती अशी की, शहरातील वाघनगरातून आलेल्या नाल्यातून एका १५ ते १८ वर्षीय अनोळखी मुलगी वाहून गेल्याची घटना आज दुपारी १ वाजता घडली. दुपारी ३ वाजेच्या सुमारास तिचा मृतदेह खंडेराव नगरात  आढळून आला  आहे. यामुळे खळबळ उडाली आहे. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच रामानंद नगर पोलीस ठाण्याच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीसांनी तिचा मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणला . शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा अद्याप या अनोळखी मुलीची ओळख पटलेली नाही.

 

आताच हाती आलेल्या माहितीनुसार या मुलीची ओळख पटली आहे गायत्री सुरेश मिस्तरी ( वय 14 वर्ष , रा. पाण्याची टाकी जवळ,  हरिविठ्ठल नगर जळगाव ) असे तिचे नाव आहे  पोलीस चौकशी करीत आहेत

 

Protected Content