ज्वारी खरेदी केंद्रे सुरु करा ; गिरीश महाजनांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

 

जामनेर : प्रतिनिधी । ज्वारी  खरेदी केंद्र सुरु करुन शासकीय खरेदी केंद्रावर विकलेल्या शेतमालाची रक्कम  शेतकऱ्यांना मिळावी म्हणून माजी मंत्री व आमदार गिरीश महाजन यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवले आहे

 

आमदार गिरीश महाजन यांनी या पत्रात म्हटले आहे की , जामनेर मतदारसंघातील रब्बी हंगाम 2020 / 21 अंतर्गत 6900.00 क्विंटल ज्वारी खरेदी करायची होती मात्र प्रत्यक्षात फक्त 1650.00 ज्वारी खरेदी झाली आहे 5250.00 क्विंटल  ज्वारी खरेदी करणे बाकी आहे प्रत्यक्षात याहून अधिक शेतकर्‍यांनी ज्वारी विकण्यासाठी  नोंदणी केलेली आहे

 

ज्वारी खरेदीसाठी केंद्र शासनाने जळगाव जिल्ह्यात तीन लाख क्विंटल उद्दिष्ट निश्चित केले होते खरेदीसाठी अंतिम मुदत 31 जुलैपर्यंत होती परंतु या मुदतीत राज्यात फक्त एक लाख 84 हजार क्विंटल ज्वारी खरेदी करण्यात आली सुमारे 1.16 लाख क्विंटल उद्दिष्ट अद्याप शिल्लक आहे खरेदीला मुदतवाढ देण्यासाठी राज्य शासनामार्फत केंद्र शासनाला मागणी प्रस्ताव पाठविणे आवश्यक आहे त्यामुळे प्रस्ताव त्वरित पाठविने अपेक्षित आहे .

ज्या शेतकऱ्यांनी शेतमाल शासकीय खरेदी केंद्रावर विकला त्यांना  आजतागायत त्यांच्या शेतमालाची विक्रीची रक्कम मिळाली नाही याबद्दल शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप आहे तरी याबाबतदेखील तात्काळ कार्यवाही करावी अशी अपेक्षा आहे

 

Protected Content