माहिती अधिकार कार्यकर्त्याला बेदम मारहाण

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शाळेबाबत माहितीचा अधिकार टाकल्याच्या कारणावरून एका ३५ वर्षीय तरूणाला महाबळ येथील पशूवैद्यकीय दवाखान्याजवळ सात ते आठ जणांनी बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना समोर आली आहे. याबाबत गुरूवार ९ मार्च रोजी रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, अमोल भास्कर पाटील (वय-३५) रा. समता नगर, जळगाव हा तरूण कुटुंबासह वास्तव्याला आहे. मजूरीचे काम करून आपला उदरनिर्वाह करीत आहे. बुधवार ८ मार्च रोजी रात्री ९ वाजता अमोल पाटील हा महाबळ येथील पशूवैद्यकीय दवाखाना येथील आम्लेट गाडीवर उभा होता. अमोल याने एका शाळेत माहितीचा अधिकारानुसार अर्ज केला होता. या रागातून सचिन तडवी, इब्राहिम तडवी, आशिष तडवी, पुरूषोत्तम चिमणकर, स्नेहल इब्राहिम तडवी, अमिता इब्राहिम तडवी, सुजाती इब्राहिम तडवी सर्व रा. संभाजी नगर यांनी अमोलला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीत अमोलच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. याप्रकरणी गुरूवार ९ मार्च रोजी दुपारी २ वाजता रामानंदनगर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. तक्रारीवरून रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेका अजित पाटील करीत आहे.

Protected Content