तो तिच्याकडे वाईट नजरेने पाहत होता… नंतर केलं असं काही..

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जिल्हापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या एका नामवंत हॉस्पिटलमध्ये महिला सुरक्षा रक्षकाचा सुपरवायझरकडून विनयभंग करून मानिसक त्रास दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याबाबत गुरूवारी ९ मार्च रोजी रात्री ८ वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जिल्हापेठ पोलीस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, जळगाव शहरातील एका भागात राहणारी ३१ वर्षीय महिला ही आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. शहरातील एका नामवंत हॉस्पिटलमध्ये महिला सुरक्षा रक्षक म्हणून नोकरीला आहे. त्याच हॉस्पिटलमध्ये खालीद अहमद बुऱ्हानोद्दीन काझी रा. जळगाव हा सुपरवायझर म्हणून नोकरीला आहे. गेल्या काही दिवसांपासून खालीद याचा महिलेकडे वाईट नजरेने बघत होता. महिला दिनाच्या दिवशी ८ मार्च रोजी सकाळी ८ वाजता पिडीत महिला ही नेहमीप्रमाणे कामावर आली. हजेरी लावण्यासाठी थम मशीनजवळ आली असतांना खालीद याने तिला थम करून दिले नाही. महिलेला अपशब्द करून तिला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करत तिचा विनयभंग केला. हा प्रकार घडल्यानंतर दुसऱ्या दिवशी गुरूवार ९ मार्च रोजी रात्री ८ वाजता महिलेने जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून संशयित आरोपी खालीद अहमद बुऱ्हानोद्दीन काझी रा. जळगाव यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक अलका शिंदे करीत आहे.

Protected Content