कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठात कर्मचाऱ्यांसाठी लसीकरण

जळगाव प्रतिनिधी । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ व जिल्हा आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठातील शिक्षक, शिक्षकेत्तर अधिकारी, कर्मचारी, कंत्राटी, दैनिक वेतनिक आणि सुरक्षारक्षक यांच्यासाठी कोविड-१९ च्या पार्श्वभुमीवर लसीकरण बुधवार  ७ जुलै, २०२१ रोजी आयोजित करण्यात आले. प्रभारी प्र-कुलगुरु प्रा.बी.व्ही.पवार कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपस्थित होते. यात १०० जणांना लस देण्यात आली. 

यावेळी मंचावर प्रभारी कुलसचिव डॉ.एस.आर.भादलीकर, प्रभारी वित्त व लेखा अधिकारी एस.आर.गोहिल, प्रा.के.एफ.पवार, ए.सी.मनोरे, इंजि.आर.आय.पाटील,  लसीकरणासाठी वैद्यकीय अधिकारी डॉ. नरेश पाटील, डाटा ऑपरेटर प्रशांत पाटील, आरोग्य कर्मचारी श्रीमती प्रिती निकम, श्रीमती कविता पाटील, श्रीमती सरला सपकाळे हे उपस्थित होते. यावेळी विद्यापीठातील १०० कर्मचाऱ्यांना कोविशील्ड लसीचा पहिला व दुसरा डोस देण्यात आला.  

शिबीराच्या यशस्वीतेसाठी डॉ. सोमनाथ वडनेरे, अरूण सपकाळे, राजू सोनवणे, प्रमोद चव्हाण, दीपक गावीत, चंद्रकांत इसे, बाळासाहेब पाटील, बलभिम गिरी, मयुर पाटील, पदमाकर कोठावडे, के.सी.पाटील, मनोज वराडे, मृणालिनी चव्हाण, शेखर बोरसे,इत्यादींनी परिश्रम घेतले. जिल्हा आरोग्य विभागाने अजून लसीचा पुरवठा करावा अशी अपेक्षा यावेळी कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली. कारण अद्याप बरेच कर्मचाऱ्यांचे लसिकरण बाकी आहे. 

Protected Content