मेहरूण येथील कंजरवाडा परिसरात अतिक्रमण विभागाची कारवाई (व्हिडीओ)

जळगाव प्रतिनिधी । शहरातील मेहरूणमधील महादेव मंदीराजवळील कंजरवाडा परिसरात महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या पथकाने पोलीस बंदोबस्तात रूवार ६ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता जेसीबीद्वारे नाल्यावर अतिक्रमण केलेली घरे पडण्यात आले.

 

गेल्या अनेक महिन्यांपासून मेहरूण मधील महादेव मदीराजवळील कंजरवाडा परिसरात असलेल्या नाल्याजवळ आधिक राहिवाश्यांनी अतिक्रमण करत रहिवास वाढविला होता. पावसाळ्याच्या दिवसात मेहरूण तलाव ओव्हर फ्लो झाल्यानंतर हा नाला ओसंडून वाहतो. या नाल्यामुळे परिसरातील घरांमध्ये पाणी शिरते. कोणतीही दुदैवी घटना घडू नये यासाठी अतिक्रमण विभागाने ही कारवाई सुरू केले आहे. यापुर्वी महापालिकेच्या वतीने अतिक्रमण धारकांना नोटीस बजावण्यात आले होते. बुधवारी ५ जानेवारी रोजी अपर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी यांच्यासह एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे, महापालिकेचे अतिक्रमण अधिक्षक इस्माईल शेख यांनी पाहणी केली होती. शुक्रवारी ६ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे अधिक्षक इस्माईल शेख आणि एमआयडीसी पोलीसांच्या बंदेाबस्तात अतिक्रमित केलेली पक्की घरे काढायला सुरूवात करण्यात आली आहे. दरम्यान नाल्याचे रूंदीकरणाचे काम महापालिकेने हाती घेतले असून काम सुरू करण्यापुर्वी ही कारवाई करण्यात येत आहे. यावेळी नागरीकांनी देखील शांततेत काढण्यास सहकार्य केले आहे.

 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!