विद्यापीठ कर्मचाऱ्यांचा सातव्या वेतन आयोगासाठी मोर्चा (व्हिडीओ)

5176a9b6 1d2d 47b6 a740 a703717165fb 1

जळगाव (प्रतिनिधी) येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील कर्मचाऱ्यांनी आज (दि.१८) सातवा वेतन आयोग लागू लागू करण्याच्या मागणीसाठी विद्यापीठ शिक्षकेतर कर्मचारी व अधिकारी संघटना, उत्तर महाराष्ट्र मागासवर्गीय संघटना व महाराष्ट्र युनिव्हर्सिटी फोरम संघटनेतर्फे सहसंचालक यांच्या कार्यालयावर मोर्चा काढला होता.हा मोर्चा सकाळी ११.०० वाजता शिवतीर्थ मैदानापासून ते सहसंचालक कार्यालयापर्यंत काढण्यात आला. या मोर्चामध्ये सुमारे २५० कर्मचारी सहभागी झाले होते. मोर्चेकऱ्यांनी विविध घोषणा देत परिसर दणाणून सोडला होता.

 

मोर्चेकऱ्यांच्या प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे आहेत, आवेदन कुटीरहित सातवा वेतन आयोग लागू करणे, सेवा अंतर्गत आश्वासित प्रगती योजनाचे बद्ध केलेले शासन निर्णय पूर्ववत लागू करणे, महाविद्यालये व विद्यापीठांमधील रिक्त असलेली सर्व शिक्षकेत्तर पदे विनाशर्त भरण्यात यावी, शिक्षकेतर पदांच्या संदर्भात ३० टक्के कपातीचे धोरण रद्द करणे, आदी. याप्रसंगी प्रमोद चव्हाण, मागासवर्गीय संघटनेचे अध्यक्ष जयंत सोनवणे, अरुण सपकाळे, संजय सपकाळे, राजू सोनवणे, महेश पाटील, दुर्योधन साळुंखे, एस आर पाटील, आधार कोळी, एस आर गोहिल कुंडलिनी चव्हाण आदी कर्मचारी उपस्थित होते.

 

 

Protected Content