अस्मिता हिंगोणेकर यांची इतिहासच्या सेट परीक्षेत यश!

जळगाव, प्रतिनिधी | निवृत्त शिक्षण उपसंचालक तथा सुप्रसिद्ध साहित्यिक शशिकांत हिंगोणेकर यांची कनिष्ठ सुपूत्री अस्मिता हिंगोणेकर या इतिहास विषयात सेट परीक्षेत यश संपादन केले आहे. याबाबत सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.

निवृत्त शिक्षण उपसंचालक (प्राथमिक ) तथा सुप्रसिद्ध साहित्यिक शशिकांत हिंगोणेकर व ज्येष्ठ कवयित्री उषा हिंगोणेकर यांच्या कनिष्ठ सुपूत्री अस्मिता शशिकांत हिंगोणेकर या इतिहास विषयात सेट परीक्षा प्रथम प्रयत्नात 50.66 टक्के गुण प्राप्त करून उत्तीर्ण झाल्या. अस्मिता या धुळे येथील प्रसिद्ध ॲडव्होकेट सिद्धांत विलास झाल्टे यांच्या पत्नी आहेत.या उत्तुंग यशाबद्दल त्यांचे डायट जळगावचे निवृत्त प्राचार्य नीळकंठ गायकवाड, निवृत्त माध्यमिक उपशिक्षणाधिकारी सिद्धार्थ नेतकर, राकेश सपकाळे सर (पाचोरा ),गजानन हार्ट हॉस्पिटलचे हृदयतज्ज्ञ डॉ.विवेक चौधरी, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.शिरीष‌ पाटील, प्रशांत पब्लिकेशन्सचे संचालक रंगराव बारी, अथर्व प्रकाशनाचे संचालक युवराज माळी,भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम पुस्तक भिशीचे जिल्हा प्रमुख विजय लुल्हे यांनी हार्दिक अभिनंदन केले आहे.

Protected Content