बुल्लीबाई ऍपच्या सूत्रधाराला अटक

नवी दिल्ली वृत्तसंस्था | वादग्रस्त ठरलेल्या बुल्लीबाई ऍपच्या नीरज बिष्णोई या मूख्य सूत्रधाराला आज आसाममधून अटक करण्यात आली आहे.

दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने बुल्लीबाई ऍपच्या प्रमुख सूत्रधाराला आसाममधून अटक केली आहे. या संदर्भात मिळालेल्या गुप्त माहितीवरून दिल्ली पोलिस आसाममध्ये पोहोचले होते, तेथून बुल्ली बाईच्या निर्मात्याला अटक करण्यात आली आहे. नीरज बिश्नोई असे आरोपीचे नाव आहे.  या प्रकरणी यापूर्वी मुंबई पोलिसांनी तीन जणांना अटक केली होती. यामध्ये श्वेता सिंग, विशाल कुमार आणि मयंक रावत यांना अटक करण्यात आली. श्वेता सिंगला उत्तराखंडमधून अटक करण्यात आली.

मुस्लिम महिला बदनामी प्रकरणी इंटरनेटवर बुली बाई पवरून सोशल मीडियावरील महिलांचे फोटो अपलोड करून त्याखाली आक्षेपार्ह पोस्ट नमूद करण्यात आल्या होत्या. ३१ डिसेंबरला प डेव्हलप करण्यात आलं. त्यानंतर बुली बाई पचे ट्विटर हँडल तयार करण्यात आले होते. बंगळुरुचा विशाल कुमार झा इंजिनियरिंगच्या द्वितीय वर्षाचा विद्यार्थीसह तिघांना अटक करण्यात आली आहे. यातच आता मुख्य सूत्रधारला अटक झाल्याने यातील सत्य समोर येण्याची शक्यता आहे.

 

 

Protected Content