कारच्या धडकेत पायी जाणाऱ्या व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू

पारोळा प्रतिनिधी । पिंपळकोठा ते अमळनेर रोडवर पायी जाणाऱ्या प्रौढ व्यक्तीला भरधाव वेगाने जाणाऱ्या वाहनाने दिलेल्या धडक दिली. त्याच त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी कार चालकाविरोधात पारोळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, झगडू दुला ठाकरे (भील) (वय-२८) रा. जिराळी ता. पारोळा हे शेती काम करून आपल्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह करतात. १६ जून रोजी सकाळी ९.४५ वाजेच्या सुमारास ते पिंपळकोठा ते अमळनेर रोडने शेतात जाण्यासाठी पायी निघाले होते. त्यावेळी इंधवे गावाच्या फरशी पुलाजवळ मागून भरधाव वेगाने येणाऱ्या वाहन मॅक्सीमो (एमएच ३९ जे ९३०६) ने जोरदार धडक दिली. त्यात ते गंभीर जखमी झाले. तातडीने त्यांनी खासगी रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले असता त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मयताचा मुलगा पिंटु झगडू ठाकरे यांच्या फिर्यादीवरून चारचाकी वाहनावरील चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ नाना पवार हे करीत आहे. 

Protected Content