बांभोरी गावात चंद्रशेखर प्रकाश अत्तरदे यांचे जल्लोषात स्वागत

4a3bcc2d 817d 4134 b987 1edd7bb0aa6a

धरणगाव (प्रतिनिधी) जळगाव ग्रामीणमधील अपक्ष उमेदवार चंद्रशेखर प्रकाश अत्तरदे यांचा बांभोरी गावात आज झंझावाती प्रचार दौरा झाला. यावेळी ग्रामस्थांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले.

 

आज सकाळी ९ वाजेच्या सुमारास मोठ्या बांभोरी गावात चंद्रशेखर अत्तरदे यांचा प्रचार दौरा उत्साहात पार पडला. यावेळी गावातील महिलांनी जागोजागी चंद्रशेखर अत्तरदे व जि.प. सदस्या माधुरीताई अत्तरदे यांचे औक्षण करून फुलहार घालून स्वागत केले. यावेळी बांभोरी प्र. चा. गावचे सरपंच राकेश नन्नवरे, ग्रा.पं.सदस्य, नांदेड-साळवा-बांभोरी गटातील शक्ति प्रमुख विकास नन्नवरे, महेश चौधरी, अधिकार पाटील, प्रकाश ठाकुर, कडू धनगर, सूंनील चौधरी, जिभाऊ पाटील, किशोर झवर, बूथ प्रमुख लीलाधर कोळी, नारायण चौधरी, प्रेमचंद पाटील, हेमराज पाटील, रविंद्र पाटील आणि गटातील बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख, पन्ना प्रमुख तसेच पदाधिकारी यांच्यासह असंख्य भाजपा कार्यकर्ते व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Protected Content