अरविंद सावंत यांचा राजीनामा मंजूर ; अवजड खात्याचा पदभार जावडेकरांकडे

arvind sawant

नवीदिल्ली, वृत्तसंस्था | शिवसेनेचे केंद्र सरकारमध्ये असलेले एकमेव मंत्री अरविंद सावंत यांनी दिलेला राजीनामा मंजूर करण्यात आला आहे. तर त्यांच्या मंत्रीपदाचा पदभार केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याकडे देण्यात आला आहे.

अरविंद सावंत यांनी दि.११ रोजी आपल्या पदाचा राजीनामा पंतप्रधान मोदी यांच्याकडे सोपवला होता. ते केंद्रात अवजड उद्योग विभागाचे मंत्री होते. त्यांच्या राजीनाम्यासोबतच त्यांनी भाजपा-शिवसेनेची सुमारे ३० वर्षे जुनी असलेली युती संपुष्टात आल्याचे स्पष्ट झाले होते.दरम्यान, भाजपने राजीमनामा मंजूर करून भाजपनेही शिवसेनेसोबतचे संबंध कायमचे तोडल्याचे दिसत आहे.

Protected Content