लता मंगेशकर यांची प्रकृती स्थिर

lata didi

मुंबई वृत्तसंस्था । गानसम्राज्ञी लता मंगेश्कर यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. लता मंगेशकर यांना श्वास घ्यायला त्रास जाणवल्याने त्यांना हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. लतादिदिंच्या प्रकृतीबाबत डॉक्टरांनी अधिकृत माहिती दिलेली नाही. मात्र दिदिंची प्रकृती स्थिर असल्याचं कुटुंबीयांच्या वतीने सांगण्यात आले आहे.

लता मंगेशकर रुग्णालयात दाखल झाल्याचे कळताच त्यांच्या चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले. लता मंगेशकर यांच्या भगिनी उषा मंगेशकर यांनी वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, त्यांना आज, मंगळवारी रुग्णालयातून घरी जाण्याची परवानगी मिळू शकते. त्या वैद्यकीय देखरेखीखाली असून जंतूसंसर्गामुळे त्यांच्यावर रुग्णालयातच उपचार करण्याचा निर्णय घेतल्याचेही त्यांनी सांगितले. त्यांना काही काळ व्हेंटिलेटरवरही ठेवण्यात आले होते. रुग्णालयात उपचार सुरू असतानाच त्यांना घरी सोडल्याची चर्चाही सुरू झाली होती. सोशल मीडियावर या दरम्यान अनेक मेसेज व्हायरल झाले.

रविवारीच लता मंगेशकर यांनी आशुतोष गोवारीकर यांच्या आगामी सिनेमा ‘पानीपत’ मधील गोपिका बाईंची भूमिका निभावणाऱ्या पद्मिनी कोल्हापुरे यांचा फर्स्ट लुक शेअर केला होता. पद्मिनी लतादीदींची भाची आहे. दीदींनी सिनेमाच्या संपूर्ण टीमला शुभेच्छा दिल्या होत्या. अलीकडेच २८ सप्टेंबर रोजी लतादीदींनी आपला ९० वा वाढदिवस साजरा केला.

Protected Content