मोठी बातमी : औरंगाबाद जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत राडा !

औरंगाबाद-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा ।  औरंगाबादच्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत  ठाकरे गटाचे आमदार उदयसिंग राजपूत यांनी आपल्याला निधी मिळत नसल्याचं मुद्दा उपस्थित केला. यावरुन मंत्री संदीपान भुमरे यांनी आणि अब्दुल सत्तार यांनी आमदार राजपूत यांचा एकेरी उल्लेख केल्याने शाब्दिक चकमक उडाली.   यावरुन थेट हमरीतुमरी सुरु झाली आणि हा वाद थेट एकमेकांच्या अंगावर जाण्यापर्यंत पोहोचला असल्याचे समोर आले.

 

मागील काही दिवसांपासून शिंदे आणि ठाकरे गटातील वाद आणखीच वाढताना पाहायला मिळत आहे. दरम्यान, आता हाच वाद औरंगाबादच्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पाहायला मिळाला. कारण यावेळी शिंदे गटाचे मंत्री आणि ठाकरे गटाचे आमदार यांच्यात राडा पाहायला मिळाला. निधी वाटपावरुन ठाकरे गटाचे आमदार उदयसिंग राजपूत यांनी जिल्हा नियोजन समितीत प्रश्न उपस्थित करत आमच्यावर अन्याय होत असल्याचा मुद्दा उपस्थितीत केला. यावरुन पालकमंत्री संदीपान भुमरे आणि मंत्री अब्दुल सत्तार यांनी राजपूत यांना उत्तर दिले. यावेळी राजपूत यांच्या मदतीला विरोधी पक्षनेते अंबादास दानवे धावून आले आणि वाद सुरु झाला. यावेळी दानवे आणि भुमरे यांच्या चांगलाच वाद झाला. या वादच एक व्हिडीओ देखील समोर आला आहे.

Protected Content