मोदींच्या प्रतिमेच्या मुद्द्यावर भाजप , काँग्रेस नेत्यांचे आरोप – प्रत्यारोप

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । पंतप्रधान मोदी यांच्या प्रतिमा खराब करण्यासाठी काँग्रेस टूलकिटचा वापर करत असल्याचा आरोप भाजपा नेत्यांनी केला आहे. तर काँग्रेन नेत्यांनी भाजपाचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

देशात कोरोनाचं इतकं मोठं संकट असताना राजकारण काही थांबत नाही. आता टूलकिटवरून काँग्रेस आणि भाजपा नेत्यांमध्ये कलगीतुरा रंगला आहे. काँग्रेसनं कोरोना संकट काळात अफवा आणि संभ्रम पसरवल्याचा व देश आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न केला जात असलायचा आरोप भाजपानं केला आहे. .

भाजपा नेते आणि मंत्र्यांनी काँग्रेसवर टूलकिटचे आरोप करणारे पोस्ट सोशल मीडियावर शेअर केले आहेत. टूलकिटबाबतची पत्रकं भाजपा नेत्यांनी शेअर केली आहेत. यात काँग्रेस कार्यकर्त्यांना ‘Indian Stain’ आणि ‘Modi Strain’ असे शब्द वापरण्याच्या सूचना देण्यात आल्याचं पोस्टमध्ये नमूद करण्यात आलं आहे. त्यासोबत कुंभ मेळ्यातून कोरोनाचा प्रसार झाल्याचा उल्लेख करण्यास सांगितल्याचा आरोपही भाजपा नेत्यांनी केला आहे. राहुल गांधी रोज करत असलेलं ट्वीटही टूलकिटचा भाग असल्याचा आरोप भाजपा प्रवक्ते संबित पात्रा यांनी केला आहे. जाणीवपूर्वक कुंभमेळ्यावर कमेंट्स केली गेली आहे. मात्र ईदवर गप्प असल्याचा आरोप भाजपा प्रवक्ते संबित पात्रा यांनी केला आहे.

काँग्रेसनं पलटवार करत भाजपाचे आरोप बिनबुडाचे असल्याचे सांगितलं आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राजीव गौडा यांनीही ट्विटरच्या माध्यमातून भाजपावर टीकास्त्र सोडलं आहे. भाजपा प्रवक्ते संबित पात्रा आणि भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यावर गुन्हा दाखल करणार असल्याचं त्यांनी ट्वीटमध्ये नमूद केलं आहे.भाजपाने केलेल्या टूलकिट आरोपनंतर आता राजकारण रंगणार यात शंका नाही.

Protected Content