राज्यात विजेची मागणी वाढली,

मुंबई, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृतसेवा – देशासह राज्यात बऱ्याच ठिकाणी उन्हाळ्याची तीव्रता वाढत आहे. वाढत्या तापमानामुळे विजेची वापर वाढला आहे. एकीकडे देशात कोळसाटंचाई असल्याने वाढीव वीजनिर्मितीवर मर्यादा आल्या आहेत, त्यामुळे राज्यात बऱ्याच ठिकाणी विजेच्या टंचाईमुळे भारनियमन केले जात आहे. ऐन उन्हाळ्यात भारनियमन संकटावर तोडगा काढण्यासाठी आज पुन्हा दुपारी मंत्रालयात मंत्रीमंडळ बैठक घेण्यात येत आहे.

देशात बऱ्याच ठिकाणी कोळसा टंचाईमुळे वीजनिर्मितीवर मर्यादा आल्या आहेत. सध्यस्थितीत राज्यात एप्रिल महिन्यात तापमानाचा पारा बऱ्याच ठिकाणी ४४ अंशावर आहे. या कालावधीत राज्यातील वीजेची मागणीने उच्चांक गाठला असून मार्च महिन्यात सुमारे २८ हजार मेगावॅटपर्यंत वीजेची मागणी होती. यापैकी एकट्या मुंबई शहराची मागणी ही ३६०० मेगावॅट एवढी होती. राज्यातील वीजेची उपलब्धतता, वीजचा वापर, उष्णतेची लाट, वाढता उष्मा यामुळे ही मागणी आणखी वाढण्याची शक्यता आहे. ही मागणी ३० हजार मेगावॅटपर्यंत जाण्याचा अंदाज आहे.

एप्रिल महिन्याची सुरुवात असून अजून मे आणि जून महिना बाकी आहे. विजेची वाढती मागणी लक्षात घेता, भारनियमनाची वेळ येऊ नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून राज्य सरकारकडून खाजगी कंपनीकडून वीज खरेदीचा करार लवकरच केला जाणार आहे. राज्य सरकारला खाजगी कंपनीकडून वीज खरेदी करावी लागणार आहे. सुमारे ७०० ते ८०० मेगावॅट वीज खरेदी करण्याचा करार लवकरच करण्यात येणार आहे. हा करार करण्यास मंत्रीमंडळाची मान्यता घ्यावी लागते, तेव्हा हा मान्यता देण्यासाठी आज दुपारी होणाऱ्या मंत्रीमंडळ बैठक पार पडणार आहे.

Protected Content