कार्यकर्त्यांनी महाविजयासाठी सज्ज रहावे : धनराज विसपुते

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | आगामी निवडणुकांमध्ये अचूक नियोजनाच्या माध्यमातून विजय मिळवता येणार असून सर्वांनी यासाठी सज्ज रहावे असे आवाहन धनराज विसपुते यांनी केले. ते आज पक्षाच्या बैठकीत बोलत होते.

 

भारतीय जनता पक्ष महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे  व राज्याचे ग्रामविकास मंत्री ना.गिरीश महाजन यांच्या आदेशानुसार  उत्तर महाराष्ट्र विभाग मतदार यादी सुसूत्रीकरण कार्यक्रम जाहीर झाला असून, मतदार यादी सुसूत्रीकरण – प्रशिक्षण व संवाद या कार्यक्रमासाठी  मंडल, शक्तिकेंद्र व बूथ निहाय नियोजन  करून त्या संबंधी कामाचे प्रशिक्षण देण्यासाठी आज भा ज पा जळगाव जिल्हा व महानगर ची बैठक आज सकाळी १०  वाजता या संदर्भात भा ज पा कार्यालय वसंत स्मृती  येथे  आयोजन केले गेले.

 

या बैठकीला  आमदार सुरेश भोळे  महानगर जिल्हाध्यक्ष  सौ. उज्ज्वलाताई बेंडाळे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष ह.भ.प. ज्ञानेश्वर  पाटील जळकेकर महाराज, रावेर लोकसभा, जिल्हाध्यक्ष अमोल जावळे,  दीपक सूर्यवंशी, लोकसभा निवडणूक प्रभारी डॉ राधेश्याम चौधरी, विशाल त्रिपाठी, महेश जोशी, सचिन पानपाटील, रेखाताई वर्मा ई उपस्थित होते. यादी सुसूत्रीकरण कार्यक्रमाचे उत्तर महाराष्ट्र विभाग प्रमुख तथा भाजपा पदवीधर प्रकोष्ठचे प्रदेश संयोजक  धनराज विसपुते यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक संपन्न झाली.

 

सदर बैठकीसाठी सर्व पदाधिकारी,  जळगाव शहर आणि ग्रामीण विभागातील निवडणूक प्रमुख, सर्व जिल्हा पदाधिकारी व मंडल अध्यक्ष व सरचिटणीस उपस्थित होते.  नियोजनबद्ध पद्धतीने काम केले तर मतदार यादी सुसूत्रीकरणाचे काम सोपे होईल व निश्चितच यश संपादन होईल असे मार्गदर्शन धनराज विसपुते यांनी केले. याच कार्यक्रमाच्या समारोपानंतर पदवीधर प्रकोष्ठ च्या जिल्हा कार्यकारिणीची बैठक संपन्न झाली.

Protected Content