संत सावता नगरातील नागरिकांनी साजरा केला पर्यावरण पूरक गणेशोत्सव (व्हिडिओ )

WhatsApp Image 2019 09 13 at 12.40.19 PM

जळगाव, प्रतिनिधी | शहरत गेल्या १० दिवसापासून गणेशोत्सवानिमित्ताने विविध धार्मिक, सामाजिक व पर्यावरण पूरक उपक्रम राबविण्यात आले.  यात संत सावता नगर येथे पर्यावरण पूरक श्री गणेशोत्सव साजरा करण्यात आला. तसेच श्री गणेशाचे विसर्जन नदी, तलावात न करणात कृत्रिम कुंड तयार करून  पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.

संत सावता नगर येथे पर्यावरण पूरक गणेशोत्सव उपक्रमांतर्गत पहिल्या दिवशी ग्रामस्वच्छता अभियान,  दुसऱ्या दिवशी, पर्यावरण संरक्षण संदर्भात, मार्गदर्शन, माझा बाप्पा माझा परिसर स्वच्छ परिसर अंतर्गत ५१ झाडे लावली.  सोबत ३ बेंचेस बसण्यास दात्यांनी दिले. मराठी अस्मिता बालसंस्कार केंद्र सुरू करण्यात आले. शेवटच्या दिवशी शाडू मातीपासुन बनविण्यात आलेल्या श्रींचे विसर्जन नदी, तलाव यांच्यात न करता कृत्रिम कुंड तयार करून त्यात विधिवत विसर्जन  करण्यात आले.

विसर्जनस्थळी वृक्षारोपण :- गणेश विसर्जन केलेल्या जागेवर वृक्षरोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. निर्माल्य नदी तलाव, विहिरमध्ये न टाकता,मनपाच्या संकलन केंद्रा मधेच निर्माल्य द्यावे असे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले होते. या उपक्रमात मंडळाच्या सदस्यांनी सहकार्य केले. यात अध्यक्ष प्रतापसिंह परदेशी, मधुकर पाटील, राजेंद्र बडगुजर, प्रमोद पाटील, किरण पाटील, अजय महाजन, विजय चौधरी, संदीप पाटील श्री सुशीलकुमार सूर्यवंशी श्री. बोरसे. कार्यक्रम अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ केंद्र दिंडोरी प्रणित,जळगाव मार्गाचे पर्यावरण प्रतिनिधी वसंत पाटील यांच्या संकल्पनेतून, राबविण्यात आला.

 

Protected Content