पाचोरा तालुक्यात स्वस्त धान्य दुकानांसाठी निविदा

पाचोरा, प्रतिनिधी | राज्यातील शहरी व ग्रामीण भागासाठी रास्तभाव दुकानांचे जाहीरनामे काढणेसाठी प्रक्रिया जिल्हा प्रशासनाकडून राबविणेत येत आहे. यासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत दि. २० नोव्हेंबर २०२१ अशी आहे.

 

जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या संकल्पनेतून सन २०२० – २०२१ करीता रास्तभाव दुकानासाठी जाहीरनामा प्रक्रियेसाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर करता येणार आहे. याकरिता जिल्हा प्रशासनाकडून विशेष संगणकीय प्रणाली विकसीत करण्यात आली आहे. रास्तभाव दुकानांसाठी ऑनलाईन अर्ज www.dsojalgaon.in या वेबसाईटद्वारे करता येईल. सदर वेबसाईटवर अर्ज भरणेकामी पाचोरा येथील तहसिल कार्यालयातील पुरवठा शाखा येथून चलन क्रमांक प्राप्त करणे आवश्यक राहिल. यानंतर ऑनलाईन पध्दतीने संपूर्ण भरलेला फॉर्म संबंधीत पंचायत / सह. संस्था / बचत गट यांचे अध्यक्ष व सचिव चे सही, शिक्क्यासह आवश्यक कागदपत्रांसह अर्ज तहसिल कार्यालयातील पुरवठा शाखेत जमा करावा.

पाचोरा तालुक्यातील खाली नमूद केलेल्या रास्तभाव दुकानासाठी जाहीरनामा नुसार अर्ज मागविण्यात येत आहे.

शहरी भाग
पाचोरा दु.नं. १०३, पाचोरा दु.नं. १०६

ग्रामीण भाग
सार्वे बु” प्र. लो., साजगांव, ओझर, चिंचखेडा खु, मोंढाळे, घुसर्डी बु” वडगांव खु” प्र.भ., परधाडे, नगरदेवळा सिम, अटलगव्हाण, सावखेडा खु”, दिघी, खेडगांव (नंदीचे), वडगांव आंबे, भोरटेक खु”, सांगवी प्र .लो., जामने, शेवाळे, पिंप्री बु” प्र. पा., कोल्हे, राजुरी खु”, लोहारी खु”, मांडकी, मोहलाई, चिंचखेडा बु”, वडगांव खु” प्र.पा., वेरुळी बु”, गोराडखेडा खु”, भोकरी, संगमेश्वर, लाखतांडा

अर्ज भरणेसाठी आवश्यक कागदपत्रे , पुरावे साक्षांकित करुन सादर करावीत. स्वयंसहाय्यता बचत गट नोंदणीकृत असले बाबत दस्तऐवज, रास्तभाव दुकान चालविणेसाठी उपलब्ध असलेल्या भांडवलाबाबतचे प्रमाणपत्र.  रास्तभाव दुकान परवाना चालविणेसाठी जागा उपलब्धतेबाबत जागेचा उतारा.  जागा स्वतःच्या मालकीची, नसल्यास जागा मालकाची रु. १०० च्या स्टॅम्प पेपरवर संमतीपत्र. संस्थेचा ठराव, ताळेबंद, बँक बॅलन्स, पोटनियमाची प्रत, त्याच गावातील / क्षेत्रातील संस्था असलेबाबत पुरावा.  स्वयंसहाय्यता बचत गटाचे सदस्य यांचे त्यांचे कुटूंबात कोणासही रास्तभाव नसलेबाबतचे प्रतिज्ञापत्र. संस्था / स्वंयसहायता बचत गटाबाबत न्यायप्रविष्ठ बाब नसलेबाबत दस्तऐवज दुकान मंजूर झालेले, संस्था नोंदणीकृत व कार्यरत असलेबाबत संस्था निबंधकाचे प्रमाणपत्र. संस्थेच्या उपविधीमध्ये स्वस्त धान्य दुकान चालविणेबावत तरतूद असणे आवश्यक राहिल. नसल्यास तशी तरतूद नमूद करुन संस्थेची उपविधी सादर करावी. अर्जदार स्वंयसहाय्यता बचतगट स्थानिक असलेबाबत पुरावा. संस्थेच्या बाबतीत कार्यक्षेत्राबाबतचा पुरावा ही कागदपत्रे आवश्यक असुन इच्छुकांनी आपले अर्ज मुदतीत दाखल करावे असे आवाहन उमेश शिर्के यांनी केले आहे.

Protected Content