अमळनेर कन्या शाळेत “उमलती कळी”विषयावर प्रबोधनपर कार्यक्रम संपन्न

अमळनेर प्रतिनिधी | मराठा सेवा संघ प्रणित, संत गाडगे महाराज प्रबोधन परिषद व नीमा फौंऊडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने श्रीमती द्रौपदाबाई रामचंद्र शेठ कन्या शाळा येथे “उमलती कळी” या विषयावर विद्यार्थिनींचे प्रबोधन करण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात जिजाऊ वंदनेने झाली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून निमा संघटनेच्या जेष्ठ सदस्या डॉ.अंजली चव्हाण आणि डॉ. लीना चौधरी उपस्थित होत्या. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका जयश्री सोनवणे तर मंचावर संत गाडगे महाराज प्रबोधन परिषदेच्या जिल्हा अध्यक्षा वैशाली शेवाळे व तालुकाध्यक्षा वर्षा पाटील तसेच सर्व सदस्य उपस्थित होते.

यावेळी डॉ लीना चौधरी यांनी मुलींना हार्मोन्सच्या बदलामुळे उदभवणाऱ्या आरोग्य समस्या विषयी माहिती दिली. वैशाली शेवाळे यांनी यामुळेच होणारे मानसिक असमतोल व होणारे बदल याबाबत माहिती दिली. सदर कार्यक्रम संत गाडगे महाराज प्रबोधन परिषदेच्या प्रदेश कार्याध्यक्ष प्रा. वैशाली पाटील याच्या मार्गदर्शनाने घेण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्या पाटील तर आभार प्रदर्शन वर्षा पाटील यांनी केले. यावेळी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Protected Content