सर्व प्रकारचे भारनियमन त्वरीत बंद करा – नागरिकांचे निवेदन

सावदा – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रमजान व विविध धार्मियांचे सण आणि तीव उन्हाळा लक्षात घेत सावदा शहरात केले जाणारे सर्व प्रकारचे भारनियमन त्वरीत बंद करावे अन्यथा आम्हांस सनदशीर मार्गाने आंदोलन करावे करण्यात येईल असा इशारा सावद्यातील नागरिकांनी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीला निवेदनाद्वारे दिला आहे.

या निवेदनात, “शहरात सध्या विज वितरण भारनियमन करण्यात येत आहे. मात्र सध्या सर्व धर्मियांचे सण सुरू असून यात मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान महिना नुकताच सुरू झाला आहे. तसेच आगामी काळात ईद, जैन धर्मियांची महावीर जयंती तसेच पारसी वांधवांचा गुड फ्रायडे, हिंदू वाधवाची हनुमान जयंती डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती असे विविध धार्मिक सण आहेत. हे सर्व वघता तसेच कडक उन्हाळा लक्षात घेता सदर भारनियमन अव्यवहार्य आहे. रमजान महिन्यात सकाळी ५ वाजेपासून सहेरीसाठी उठून पाणी भरावे लागते. अनेक ठिकाणी अगोदरच कमी दाबाने पाणी येते. अशा वेळी रोजा ठेवणा-या भाविकांची मोठी गैरसोय होत आहे.

रोजा असल्याने दिवसभर नागरीक मोठया सहनशीलता ठेवून अन्न व पाणीविना रोजा ठेवत असल्याने अशा वेळी भारनियमन केल्याने त्यांना मोठा त्रास सहन करावा लागतो. म्हणून रमजान व विविध धार्मियांचे सण बघता व तीव उन्हाळा लक्षात घेता सावदा शहरात केले जाणारे सर्व प्रकारचे भारनियमन त्वरीत बंद करावे; अन्यथा आम्हांस सनदशीर मार्गाने आंदोलन करावे करण्यात येईल. होणा-या परिणामास सर्वस्वी महावितरण जवाबदार राहिल.” असा इशारा निवेदनात नागरिकांनी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीला दिला आहे.

Protected Content