डॉ. आचार्य विद्यालयात आकाशकंदील व दिव्यांचे प्रदर्शन

 

जळगाव, प्रतिनिधी । डॉ.अविनाश आचार्य विद्यालय प्राथमिक विभागात कार्यानुभव याविषया अंतर्गत दिवाळी या सणाच्या निमित्ताने आकाशकंदील व दिव्यांचे ऑनलाईनच्या माध्यमातून प्रदर्शन भरवण्यात आले.

इयत्ता पहिलीच्याविद्यार्थ्यांनी रंगीबेरंगी कागदापासून व घरातील वस्तूंचा वापर करून आकर्षक कागदी दिवे तयार करून त्याची सजावट केली. इयत्ता दुसरीच्या विद्यार्थ्यांनी कार्डशीट साह्याने शुभेच्छा पत्र तयार केले, आपल्या आई वडिलांना व नातेवाईकांना मुलांनी शुभेच्छा पत्र दिले. इयत्ता तिसरी व चौथीच्या विद्यार्थ्यांनी विविध रंगाचे पर्यावरण पूर्वक आकाशकंदील तयार केले. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा,त्यांच्यातील कलात्मकवृत्ती वाढवी या हेतूने प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. मुख्याध्यापिका योगिता शिंपी यांचे मार्गदर्शन लाभले. तारामती परदेसी, सीमा पाटील तुषार पुराणिक व इयत्ता पहिलीच्या वर्गशिक्षकानीं नियोजन केले.

Protected Content