सदावर्तेंना पोलीस कोठडी नाही तर १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

मुंबई – लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसंस्था । संपकरी एस.टी.कामगारांना चिथावून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ‘सिल्वर ओक’ या निवास्थानावर दगडफेक आणि आंदोलन करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी अटकेत असलेले गुणरत्न सदावर्ते यांना पोलीसांनी सात दिवसांची कोठडी मागितली होती मात्र मात्र न्यायालायने पोलीस कोठडीस नकार दर्शवत अॅड.सदावर्तेंना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

पोलीस कोठडी संपत असल्याने सदावर्ते यांची यांना आज न्यायालयात हजर करण्यात आलं. न्यायाधीश नदीम मेमन यांच्यासमोर ही सुनावणी झाली. यात सदावर्ते यांच्यावतीने आज अॅड.मृणमयी कुलकर्णी यांनी युक्तीवाद केला. दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकल्यानंतर न्यायाधीशांनी सदावर्तेंना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. यामुळे आता सदावर्तेंचा जामीनासाठी अर्ज करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

पोलीसांकडून सदावर्तेंना सात दिवसांची पोलीस कोठडी दिली जावी ही मागणी न्यायालयाने फेटाळली तर, इतर आरोपींना दि. १६ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. याचबरोबर न्यायालयाने आरोपी अॅड.सदावर्तेचा ताबा सातारा पोलीसांना दिला असल्याची माहिती सरकारी वकील प्रदीप घरत यांनी दिली.

Protected Content