पंतप्रधानांच्या भेटीला ज्योतिरादित्य शिंदे !

नवी दिल्ली वृत्तसंस्था । काँग्रेसचे नाराज नेते ज्योतिरादित्य शिंदे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी पोहचले असून त्यांच्या सोबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह असल्याचे वृत्त आहे.

ज्योतिरादित्य शिंदे हे आजच भाजप प्रवेशाची घोषणा करण्याची शक्यता आहे. त्यांना राज्यसभेवर घेऊन केंद्रीय मंत्रीपद देण्यात येईल असे मानले जात आहे. तर त्यांच्या समर्थक आमदारांना कमलनाथ यांच्या जागी येणार्‍या भाजप सरकारमध्ये महत्वाची पदे प्रदान करण्यात येतील असे राजकीय निरिक्षकांचे मत आहे. या पार्श्‍वभूमिवर, आज सकाळी ज्योतिरादित्य शिंदे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्यासाठी दिल्लीत दाखल झाले आहेत. त्यांच्या सोबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हेदेखील आहेत. या भेटीनंतर ते भाजप प्रवेशाची घोषणा करण्याची शक्यता आहे.

Protected Content