प्रेमी युगुलाची गळफास घेत आत्महत्या

रावेर, लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी – रावेर तालुक्यातील विश्राम जिन्सी येथे प्रेमी युगुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. यामुळे जिन्सी परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच रावेर पोलिस घटनास्थळी रवाना झाले आहे.

या बाबत वृत्त असे की, रावेर तालुक्यात विश्राम जिन्सी येथे एका मुलाने व मूलीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. युवक आणि युवती ही अविवाहीत असुन गावापासुन जवळच काही अंतरावर असलेल्या शेतातील झाडाला दोघांचे मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले आहेत. प्रकरणातुन या दोघांनी आत्महत्या केली असावी, अशी कुजबुज ग्रामस्था मध्ये केली जात आहे. रावेर पोलिस निरिक्षक कैलास नागरे, पोलिस उप निरीक्षक विशाल सोनवणे आदि सहका-यांसह पोलीस पथक घटनास्थळी रवाना झाले आहे. दोघांची आत्महत्या केली असल्याची पोलिसांची प्राथमिक माहीती आहे.

Protected Content