प्रलंबित मागण्यांसाठी पेंटर बांधवांचे जिल्हा प्रशासनाला निवेदन (व्हिडीओ)

जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यातील पेंटर बांधवांना शासकीय योजनाचा लाभ मिळावा या मागणीसाठी हिंदू मुस्लिम एका बिल्डिंग पेंटर वेलफेअर असोसिएशनच्या वतीने जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले.

बुधवारी २२ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजता दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जळगाव बिल्डिंग पेंटर असोसिएशनच्या हिंदू मुस्लिम एका बिल्डिंग पेंटर वेलफेअर असोसिएशनच्या सभासदांना महाराष्ट्र इमातर कामगार कल्याणकारी मंडळाच्या शासकीय योजनांचा लाभापासून वंचीत आहे.

गेल्या २० महिन्यांपासून सुरू असलेल्या कोरोनामुळे रोजगार कमी झाला. त्यामुळे कामगारांना उपासमारीची वेळ आली आहे. अश्या परिस्थितीत शासकीय योजनांचा लाभ न मिळाल्याने कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली आहे. शिवाय कामगारांना शिष्यवृत्ती मिळत नाही, अपघाताचे क्लेम मिळत नाही. अमळनेर, पारोळा, एरंडोल, चोपडा म्हसावद येथील सर्व पेंटर बांधवांना कोणत्याही प्रकारच्या शासकीय योजनांचा फायदा मिळत नाही.

शासकीय योजनांची लाभ घेण्यासाठी दिलेल्या प्रकरणांमध्ये प्रत्येकवेळी वेगवेगळे कारण दाखवून ना मंजूर केले जात आहे. यापूर्वी संघटनेच्या माध्यमातून मागण्यांसाठी ३ ते ४ वेळा निवेदन देवून याप्रकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. येत्या १५ दिवसांत यावर कार्यवाही न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पेंटर बांधव आमरण उपोषणाला बसणार असल्याचा इशारा जिल्हाध्यक्ष ईस्माईल खान यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.

यावेळी ईस्माईल खान, संदिप कुमावत, अकिल बाबा, दगडू शहा, अकिल खान, पारोळा शाखाचे अध्यक्ष रवी, मुकतार, अमलनेर शाखेचे अध्यक्ष कैलास पाटील, युसुफ, महसावद शाखेचे अध्यक्ष अश्फाक शहा, सदिप सोनवणे आदींची उपस्थिती होती.

फेसबुक व्हिडीओ लिंक
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/1494832820899903

Protected Content