शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालयात लसीकरणाची सुविधा सुरु

जळगाव प्रतिनिधी । येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात मंगळवारी २२ डिसेंबर २०२० पासून विविध लसीकरण देण्यासाठी प्रारंभ झाला आहे. मंगळवारी २२ डिसेंबर रोजी पहिल्याच दिवशी लहान मुले, गर्भवती महिलांनी लसीकरणाचा लाभ घेतला.

प्रत्येक लहान मुले, बालके यांना लस देणे अत्यावश्यक आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात कोरोनाव्यतिरिक्त इतर ओपीडी सुविधा सुरु झाल्यानंतर विविध प्रकारच्या लसी देण्याची सुविधादेखील आता मंगळवार दि. २२ पासून सुरु झाली आहे. पहिल्याच दिवशी नवजात बालके, मुलं, किशोरवयीन यांच्यासह गरोदर स्त्रियांनी लसीकरण करण्यासाठी हजेरी लावली. रुग्णालयात कक्ष क्रमांक २१० मध्ये या सुविधा दर मंगळवार, गुरुवार, शनिवार अशा आटवड्यातून तीन दिवस विनामूल्य लसी उपलब्ध झाल्या आहेत. नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, वैद्यकीय अधीक्षक डॉ. वैभव सोनार यांनी केले आहे.

Protected Content