वीजबिल भरण्याचे सांगून बनावट लिंकद्वारे चार लाखांचा ऑनलाईन गंडा !

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । ईलेक्ट्रीक ऑफीसर असल्याचे भासवून वीजबिल भरण्यासाठी बनावट लिंक पाठवून बँक खात्यातून ३ लाख ९६ हजार ६०९ रूपयांची ऑनलाईन फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत जळगाव सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

सायबर विभागातून मिळालेल्या माहितीनुसार, जगदीश प्रितमदास जेठवाणी (वय-४०) रा. वैभव कॉलनी, गणपती नगर, जळगाव हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. व्यापार करून आपला उदरनिर्वाह करतात. बुधवार १७ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४.३० ते ७ वाजेच दरम्यान, त्यांच्या पत्नीच्या मोबाईलवर अनोळखी नंबरवरून व्हॅटस्ॲप मॅसेज आला. विजबिल भरण्याचे सांगण्यात आले होते. त्यानुसार जगदीश जेठवाणी यांनी दिलेल्या नंबरवर कॉल केला असता आपण ईलेक्ट्रीक ऑफीसर असल्याचे सांगितले. वीजबिल भरण्याचे सांगून जेठवाणी यांच्या मोबाईलवर बनावट लिंक पाठविली. दिलेल्या लिंकच्या माध्यमातून बँकेचे डिटेल्स घेवून त्यांच्या खात्यातून परस्पर ३ लाख ९६ हजार ६०९ रूपये वळविण्यात आले. दरम्यान, आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर जगदीश जेठवाणी यांनी जळगाव सायबर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून गुरूवार १८ ऑगस्ट रोजी दुपारी ४ वाजता जळगाव सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक लिलाधर कानडे करीत आहे.

Protected Content