पाचोरा न्यायालयात प्रजासत्ताक दिवस उत्साहात साजरा !

पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पाचोरा येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात ७४ वा भारतीय प्रजासत्ताक दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

यावेळी न्यायीक अधिकारी सहदिवाणी न्यायाधीश मंगला हिवराळे, २ रे सह दिवाणी न्यायाधीश ललित श्रीखंडे, सरकारी अभियोक्ता अॅड. आर. के. माने, वकिल संघाचे अध्यक्ष अॅड. प्रवीण पाटील, सचिव अॅड. राजेंद्र पाटील, सहाय्यक अधिक्षक ए. आर. पाटील उपस्थित होते. यावेळी न्यायिक अधिकारी मंगला हिवराळे यांचे हस्ते ध्वजपूजन व ध्वजारोहण झाले.
यानंतर सहाय्यक अधीक्षक गोविंद पवार यांनी स्वरचित संविधानावर आधारित गीत गाऊन उपस्थितांची मने जिंकली. यावेळी ध्वजारोहणासाठी वकील संघाचे सदस्य, जेष्ठ सदस्य, महिला विधिज्ञ, विविध विभागातील कर्मचारी, पोलीस कर्मचारी, शिक्षक, तसेच न्यायालयीन कर्मचारी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Protected Content