फैजपूर येथील शितल ॲकडमीत प्रजासत्ताक दिन साजरा

फैजपूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त फैजपूर शहरातील शितल अकॅडमी येथे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. डान्स नृत्य संगीत नाटिका आणि भाषणे अशी काही कला विद्यार्थ्यांनी सादर केले.

प्रमुख उपस्थिती कॅप्टन डॉ. राजेंद्र राजपूत सर (धनाजी नाना महाविद्यालय फैजपूर ), श्री गाढे (रिटायर्ड आर्मी ऑफिसर ), कीर्ती मॅम ( प्रिन्सिपल लिटल स्टार स्कूल, फैजपुर ), डॉक्टर सावसाकडे सर (प्राध्यापक धनाजी नाना महाविद्यालय फैजपूर ), श्री. अर्जुन सोनवणे ( पोलीस अधीक्षक, रावेर), श्री सचिन भिडे , ऍड. गणेश पाटील आणि सौ.दीप्ती पाटील व वृषाली मॅम यांनी देखील उपस्थिती दाखवली.

आणि कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापिका. प्राजक्ता काचकुटे मॅम यांनी केले. विद्यार्थ्यांनी सैनिकांची भूमिका तसेच सैनिकांचे जीवन आपल्या नाटीकेद्वारे आणि नृत्यद्वारे प्रेक्षकांसमोर सादर करून अगदी भुरळ घातली कार्यक्रमात काही आदर्श विद्यार्थ्यांचा देखील गुणगौरव करण्यात आला त्यात यज्ञ सावसाकडे , शिवम बोदडे आणि नेहा चौधरी या विद्यार्थ्यांचा आदर्श विद्यार्थी म्हणून त्यांच्या पालकासह सत्कार करण्यात आला.

शितल अकॅडमी चे संचालक माननीय श्री शुभम सैंदाणे सर यांनी विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे आणि मोठे व्यासपीठ उपलब्ध करून दिले यासाठी सर्व पालकांनी आभारसुद्धा व्यक्त केले. कार्यक्रमाला ४०० ते ५०० पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी भरभरून उपस्थिती दाखवली . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रणाली तायडे आणि रचना किरंगे या विद्यार्थ्यांनी केले.

Protected Content