सातपुडा पर्वतातील अतिदुर्गम भागातील आदीवासींना उद्या जीवनाश्यक वस्तूंचे वाटप

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील किनगाव येथील उपप्राथमिक आरोग्य केंद्र आणि निरभ्र निर्भय फाऊंडेशनच्या वतीने तालुक्यातील सातपुडा पर्वतातील अतिदुर्गम भागात मोलमजुरी करणाऱ्या आदीवासी ३० कुटुंबांना उद्या जीवनाश्यक वस्तूंचे वाटप करण्यात येणार आहे.

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात ३ मे पर्यंत संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे. अशा परिस्थितीत मोलमजुरी करून हातावर पोट भरणाऱ्या गोरगरिबांची कामे पूर्णपणे बंद असल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे. यासाठी अनेक सामाजिक संस्था मदतीचा हात घेऊन पुढे सरसावले असून यातूनच यावल फैजपूर व्यापारी मंडळातर्फे यावल तहसील कार्यालयामध्ये गरजूंना अन्नधान्य वाटप व्हावे या सामाजिक दृष्टिकोनातूनच व्यापारी मंडळाच्यावतीने क्विंटल साठा उपलब्ध झाला आहे. विविध ठिकाणी मागणीनुसार गरजे गोरगरिबांना धान्य वाटप करण्यासाठी देण्यात येत आहे.

यावल तालुक्‍यातील किनगाव येथील उपप्राथमिक केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी व निरभ्र निर्भय फाऊंडेशन भुसावळच्या संस्थापक डॉ.मनीषा महाजन यांच्या संयुक्त विद्यमाने यावल तालुक्यातील सातपुडा पर्वतातील अतिदुर्गम भागात मोलमजुरी करून जीवन जगणारे आदिवासी कुटुंबांसाठी उद्या तीस कुटुंबांना जीवनावश्यक वस्तू वाटप करण्यात येणार आहे. यावल तहसील कार्यालयातील व्यापारी मंडळाकडून मदतीसाठी मिळालेल्या गहूमधून आज ३ क्विंटल धान्य देण्यात आले. उद्याही धान्य जीवनावश्यक वस्तू सातपुड्यातील दुर्गम भागात असलेल्या सांगयादेव व माथन या पाड्यावरील राहणाऱ्या सुमारे १०० आदिवासी लोकांना जीवनावश्यक वस्तू वाटप करण्यात येणार आहे, अशी माहिती उपप्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.मनीषा महाजन यांनी दिली आहे. दरम्यान यावर तहसील कार्यालयात या अन्नधान्य कार्यक्रमासाठी लागणारे गहू घेण्यासाठी त्या आल्या होत्या यावेळी यावर तसेच निवासी नायब तहसीलदार आर.के.पवार, वैद्यकीय अधिकारी डॉ.मनीषा महाजन त्यांच्यासोबत असलेले परिचारक देशपांडे व वाहनचालक कुरबान तडवी आवश्यक असलेले गहू धान्य दिले.

१७ एप्रिल रोजी सातपुडा पर्वतातील अतिदुर्गम भागात असलेल्या आदिवासी पाड्यावर अन्नधान्य वाटपाचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी किनगाव प्राथमिक आरोग्य केंद्रच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.मनीषा महाजन, निरभ्र निर्भय फाऊंडेशनचे सचिव कल्पेश महाजन, खजिनदार लालचंद महाजन व संस्थेचे सर्व पदाधिकारी परिश्रम घेत आहे.

Protected Content