अंगणवाडीचा कुलुप तोडून शासकीय साहित्याची चोरी

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील सावखेडा सिम येथील अंगनवाडीचे कुलुप तोडून अज्ञात चोरट्यांनी लांबविले अंगनवाडीचे साहित्य पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

या संदर्भात पोलीस सुत्रांकडून मिळालेली साविस्तर माहिती अशी की ,सावखेडा सिम तालुका यावल येथे गावात असलेल्या अंगनवाडीत दिनांक २३ नोव्हेंबर रोजी अज्ञात चोरटयांनी अंगनवाडीचे कुलुप तोडून अंगनवाडीत ठेवलेली डीजीटल स्मार्ट टीव्ही, सोलर ,स्टील पाण्याची टाकी, ईनव्हर्टर, टेबल फैन आणि अंगनवाडी सेविका यांचे खाजगी गॅस शेगडी व भारत कंपनीची हंडी व साहीत्य आदी सुमारे २o ते ३० हजार रूपये अंदाजीत किमतीचे शासकीय साहित्याची कुणीतरी अज्ञात चोरट्यांनी अंगनवाडीच्या दरवाज्याचे कुलुप तोडून आत प्रवेश करून चोरून नेल्याची घटना समोर आली आहे .

याबाबत सावखेडा सिम येथील अंगनवाडीत सेविका म्हणुन काम करणाऱ्या वैशाली मिलिंद महाजन यांनी यावल तालुका बालविकास प्रकल्य अधिकारी अर्चना आटोळे यांच्या सुचने वरून यावल पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केल्याने अज्ञात चोरट्या विरूद्ध  गुन्हा दाखल करण्यात आला असुन ,बालविकास  पुढील तपास पोलीस निरिक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार विजय पाचपोळे, हॅड कॉन्सटेबल राजेन्द्र पवार पोलिस करीत आहे

Protected Content