आ. मंगेश चव्हाणांसह इतरांची नाशिक कारागृहात रवानगी

जळगाव प्रतिनिधी । वीज कनेक्शन तोडल्याच्या कारणावरून चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांच्यासह ४० ते ५० जणांच्या जमावाने महावितरण अधिक्षक अभियंता यांना खूर्चीत बांधून मारहाण केली. याप्रकरणातील अटकेत असलेले आमदार चव्हाण यांच्यासह ३१ जणांना आज नाशिक कारागृहात रवानगी केली आहे.

आमदार चव्हाण यांच्यासह सुमारे ४० ते ५० जणांना जमाव शुक्रवारी २६ मार्च रोजी महावितरणच्या कार्यालयात गेला होता. यावेळी आमदारांसह जमावातील शेतकऱ्यांनी फारुख यांना दोरीने खुर्चीत बांधुन मारहाण केली. चपलांचा हार घातला. या प्रकरणी फारुख यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन शुक्रवारी रात्री आमदार चव्हाण यांच्यासह ४० ते ५० जणांवर एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येऊन चव्हाणांसह ३१ जणांना अटक केली हीती. अटकेतील सर्व संशयितांच्या पोलिस कोठडीची मुदत मंगळवारी संपली. यामुळे त्यांना जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी पोलिसांकडून सर्व संशयितांच्या न्यायालयीन कोठडीची मागणी करण्यात आली होती. सुनावणीअंती न्यायालयाने सर्वांना न्यायालयीन कोठडी दिली. आमदार चव्हाण यांच्यासह सर्व ३१ संशयितांना नाशिक कारागृहात हलवण्यात आले.

Protected Content